पांघरूण..

क्वचितच अशी उत्कृष्ट कलाकृती आपल्या समोर येते!

महेशने भावभावनांचे पदर अतिशय संयमाने हाताळले आहेत,सर्व कलाकारांनी आपापल्या भुमिकांना न्याय दिला आहे,मग प्रमुख भूमिकेतील गौरी आणि अमोल असो किंवा इतर सहकारी!

आशयघन आपल्याकडे भरभरून आहे, उत्तम कथा, कादंबर्या,यांची आपल्याकडे रेलचेल आहे, आणि बोरकरांच्या हि अप्रतिम कथा,त्या जुन्या काळातील स्त्रीची घुसमट, समाजातील चालीरीती, वेशभूषा, निसर्गाने नटलेले गाव,सर्वच आपल्या समोर संयतपणे आणि तंतोतंत प्रकट होते! अप्रतिम गाणी, सुमधुर संगीत, सुंदर छायाचित्रण, आणि कलात्मक सादरीकरण याचे उत्कृष्ट मिश्रण 👍

गरज आहे रसिकांच्या उत्तम प्रतिसादाची..अशा कलाकृती सातत्याने घडायला हव्यात आणि आपल्याला त्यांचा रसास्वाद घेता यावा 🙏